Thursday, January 8, 2026
Homeराजकीयशरद पवारांनी अमोल कोल्हेंवर सोपवली मोठी जबाबदारी

शरद पवारांनी अमोल कोल्हेंवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उपनेता, मुख्य प्रतोद म्हणून अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे की, “एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले. ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ; मात्र, तरीही पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार”, अशा भावना कोल्हेंनी व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा : शेअर मार्केटमध्ये कोटींची गुंतवणूक, एकही कार नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती नेमकी किती?

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...