Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : आजचा प्रकार इतरांना नवीन, मला नाही; अजित पवार यांच्या...

Sharad Pawar : आजचा प्रकार इतरांना नवीन, मला नाही; अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांची रोखठोक भूमिका

मुंबई | Mumbai

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, आदिती तटकरे, बाबुराव आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान या राजकीय भूकंपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

शरद पवार बोलताना म्हणाले, आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, १९८० साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. मला आठवतंय की, १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे नेते पक्ष सोडून गेले. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता झालो होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो होतो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यामध्ये आमची संख्या ६९ वर गेली. संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० साली जे चित्र दिसलं ते चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील असं ते म्हणाले आहेत.

Ajit Pawar : …म्हणून शिंदे फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला; शपथविधीनंतर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हीच पक्ष आहोत, ही त्यांची भूमिका आहे. पक्षातील विधिमंडळातील सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचे चित्र आणखी दोन-तीन दिवसांत समोर येईल. कारण ज्यांची नावं आली आहेत. त्यापैकी काही जणांना माझ्याशी संपर्क साधला. काही लोकांनी मला सांगितलं की, आम्हाला निमंत्रित करण्यात आले, आम्ही सह्या केल्या आहेत. पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे. याबाबत मी आत्ताच बोलू इच्छित नाही. कारण, जनतेसमोर स्वच्छ चित्र मांडण्याची गरज आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी ते चित्र जनतेसमोर मांडावे अन्यथा त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असा निष्कर्ष मी काढेन, असा इशारा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासोबत गेलेला आमदार शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतरणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिली महिला मंत्री राष्ट्रवादीची

- Advertisment -

ताज्या बातम्या