मुंबई | Mumbai
लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला (OM Birla) यांची निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्वागत केले होते. यावेळी “खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीने तुमचे स्वागत करतो,” असे तटकरेंनी ओम बिर्लांना उद्देशून म्हटले होते.त्यामुळे लोकसभेत गदारोळ झाला होता. त्यावर आज शरद पवार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलतांना तटकरे यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : Nashik News : ग्रामीण पाेलिसांचे डाेंगर दऱ्यांतील हातभट्ट्यांवर छापे
यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेने सांगितले आहे. आमचे दहापैकी आठ खासदार निवडून आले आहेत. एक जागेवर पिपाणी आणि तुतारीच्या फरकामुळे पराभव झाला आहे. नाहीतर दहापैकी ९ जागा निवडून आल्या असत्या”, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. तसेच पवारांनी राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचे उत्तर जनतेने त्यांच्या मतदानातून दिल्याचेच जणू सुचविले आहे. विधानसभेतील स्ट्राईक रेटचा उल्लेख करत त्यांनी हाच फॉर्म्युला कायम राहण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : प्लास्टिक बंदीबाबत मनपा व्यापक मोहीम राबविणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक वर्षांचा कालावधी होत आहे.निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांकडे ‘खरी राष्ट्रवादी’असल्याचा निकाल दिला. तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) असे नाव निवडणूक आयोगाने दिले. पण, यानंतरही ‘खऱ्या राष्ट्रवादी’वरून वाद सुरू आहे. त्यातच तटकरे यांनी लोकसभेत खऱ्या राष्ट्रवादीचा उल्लेख करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आज शरद पवारांनी प्रत्युत्तर देत तटकरेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यामुळे आता यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून का प्रत्युतर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा