Monday, June 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: शेतकरी कर्ज माफीसंदर्भात शरद पवारांनी दिल्या सुचना; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी संबंधित…

Sharad Pawar: शेतकरी कर्ज माफीसंदर्भात शरद पवारांनी दिल्या सुचना; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी संबंधित…

पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबाबत सरकारला महत्त्वाची सूचना केली आहे. कर्जमाफीचे काही निकष शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याने त्यात योग्य बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कर्जमाफीच्या त्यात अटी आहेत. त्या अडचणीच्या आहेत. पण सरकार जेव्हा निर्णय घेते तेव्हा त्याचे सूत्र लोकांना मान्य नसते. पण सरकार निर्णय घेत असते. अशावेळी लोकशाहीत सुसंवाद साधून त्यात दुरुस्ती करणे याची आवश्यकता असते.

- Advertisement -

दादरमध्ये BEST बसचा मोठा अपघात; बसने कार-बाईकला उडवलं, एक ठार, अनेक जण जखमी

मी एवढेच सांगेल, मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील संबंधित लोकांशी बोलून कर्जमाफीचा जो निर्णय घेतला, त्यातील अटी कशा दुरुस्त होईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल हे पाहिले पाहिजे. कर्जमाफीच्या मुद्द्यात त्यात काही कमतरता आहे म्हणून तो फेकून द्या, ही भूमिका घेण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्याकडे रिपोर्ट आलाय. केळी आणि ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. तज्ज्ञांची एक टीम आम्ही पाठवली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी पाहणी केली. काय करायची गरज आहे, याचे लेखी निवेदन आमच्याकडे आलं आहे. शास्त्रज्ञ येऊन गेले. बघूया. ते काही आमच्या हातात नाही, असे आदरणीय शरद पवार साहेब म्हणाले.

ताज्या बातम्या

Rahata : भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करूनच महामार्गांचे आराखडे तयार करा

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata भविष्यातील वाहतुकीचे नियोजन विचारात घेऊन सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या (National Highways) कामाचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department) आणि राष्ट्रीय महामार्ग...