Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांचे नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द

शरद पवारांचे नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द

मुंबई । Mumbai

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याचे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान आज सकाळच्या सुमारास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्विट करीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे शरद पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शरद पवारांसह छगन भुजबळ यांनी कालच एका विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आज सकाळी पॉझिटिव्ह असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात कि, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या