Saturday, September 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोदींच्या 'त्या' ऑफरवर शरद पवार स्पष्टच बोलले

मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवार स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सध्या महाराष्ट्रात प्रचार सभांचा जोरदार झंजावात सुरु आहे. शुक्रवारी (१०) नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेमध्ये मोदी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. पंतप्रधान मोदींच्या या प्रस्तावानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मोदी यांच्या या प्रतिक्रियेवर खुद्द शरद पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, मोदींची भाषणं ही देशाच्या हितासाठी नाहीत. देशाच्या हिताचं नाही तिथे जाणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. आमची विचारधारा गांधी आणि नेहरूंची असल्याने, त्यांच्यासोबत जाणे कदापी शक्य नाही. पंतप्रधानांच्या ऑफरवर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडलीये. मोदींमुळे संसदीय लोकशाही पद्धतीवर पंतप्रधानांचा विश्वास नसून ती संकटात आल्याचा आरोपही पवारांनी केला.

हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना मोठी ऑफर; म्हणाले…

तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही मोदींच्या प्रस्तावावर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी हे भानावर नाहीत, त्यामुळेच ते अशा प्रकारची विधानं करत आहेत, असे ते म्हणाले. “या देशातून आम्हाला नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही नष्ट करायची आहे. हे आमचं स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही ४ जूननंतर पूर्ण करू. मी कालच सांगितले आहे की नरेंद्र मोदींची प्रकृती बरी नाही. ज्या पद्धतीने त्यांची भाषणे सुरू आहेत, ती पंतप्रधान पदाला शोभणारी नाहीत. आपण काल काय बोललो, आज काय बोलतोय याचे भान त्यांना नाही. त्यातूनच अशा प्रकारची विधाने येत आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींचा बुद्ध्यांक कमी आहे. त्यांनी आधी लिहायला आणि वाचायला शिकले पाहिजे”, असेही ते म्हणाले.

मोदी काय म्हणाले होते
नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या