मुंबई | Mumbai
आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या बैठका होत असून उमेदवारांची आणि मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. यात राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) मागील तीन दिवसांपासून जागावाटपासंदर्भात बैठका सुरु असून तिन्ही पक्षांतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसाठी जे इच्छुक आहेत, त्यांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि इतर वरिष्ठ नेते त्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अंतिम निर्णय घेतील. राज्यात मविआचे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एखादी जागा तीनपैकी कोणत्या पक्षाने लढवावी, यावर विचार सुरू आहे. तीन दिवसांपासून मविआचे (MVA) नेते एकत्र बसून जागावाटापावर मंथन करत आहेत. पुढच्या दहा दिवसात जागावाटपाचा मुद्दा अंतिम झालेला असेल”, असे शरद पवारांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले
पुढे बोलतांना पवार म्हणाले की, “जागावाटपानंतर लोकांमध्ये जावं लागेल आणि भूमिका मांडणे सूरू होईल. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस ०१ तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. आता ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे.याचा अर्थ लोक परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. सत्ताधारी भाजपा (BJP) आणि त्यांच्या सहकारी पक्षांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत लोक आहेत. त्यामुळे एक आशादायक चित्र दिसत असून त्याबाबत आम्ही कामाला लागलो आहोत”, असेही शरद पवारांनी म्हटले.
हे देखील वाचा : …तर हे औदार्य महागात पडेल; ‘या’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरेंना थेट इशारा
आरक्षणावर सामंजस्याने मार्ग काढला पाहीजे
आरक्षणाचे (Reservation) मुद्दे सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढायचे काही कारण नाही. आपला जात, धर्म वेगळा असला तरी आपण सर्व भारतीय आहोत. महाराष्ट्राचा आपण सर्व घटक आहोत. सर्व समाजात सामंज्यस्य कसे राहिल, याबाबतची भूमिका या विषयात जे काम करत आहेत, त्यांनी घेतली पाहीजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांवर निर्णय घेताना लोकांना सामील करून घेतले पाहीजे. तसेच वातावरण चांगले कसे राहिल, याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे, असे शरद पवारांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा