शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
राज्याच्या नकाशावर प्रकाशात आलेले तालुक्यातील शेअर मार्केट फसवणुकप्रकरणात दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील दोन आरोपींना शेवगाव पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली आहे.
नवनाथ इसरवाडे (रा.गदेवाडी ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिलेली आहे. एके ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमुद केलेले आहे. इसरवाडे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून पथक तयार करण्यात केले होते. दरम्यान पाटील यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अशोक कदम, लक्ष्मण उर्फ बबलु मडके हे गदेवाडी याठिकाणी असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी आरोपींना पोलीसांची चाहूल लागल्याने ते पळून जात असतांना त्यांना गदेवाडी व बोधेगाव याठिकाणाहून ताब्यात घेतले. ही करावाई पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरिक्षक अनिल बागुल, हवालदार अमोल पवार, परशुराम नाकाडे, शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे, संतोष वाघ, संपत खेडकर, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर यांनी केली.