Friday, July 12, 2024
Homeदेश विदेशराज कुंद्राकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

राज कुंद्राकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली / New Delhi – बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्‍लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज (प्रदर्शित) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्याला 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, 28 जुलैला न्यायालयानं याचा जामीन अर्जही फेटाळून लावला आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रानं मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलसमोर आपला जबाब नोंदवला आहे.

शर्लिन चोप्रानं आपल्या तक्रारीत खुलासा केला आहे की, राज कुंद्रानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला विरोध करत होती, तरीही कुंद्रा तिचं ऐकत नव्हता. तिनं राज कुंद्राला थांबण्यासाठी सांगितलं कारण ती फार घाबरली होती. त्यानंतर तिनं त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून सुटका करुन घेत ती बाथरुममध्ये पळून गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या