Sunday, November 8, 2026
HomeनगरAccident News : दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

Accident News : दिवाळीच्या खरेदीला निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

दुचाकी-ट्रकची समोरासमोर धडक

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

दिवाळीसाठी (Diwali Shopping) कपड्यांची खरेदी करण्यासाठी शेवगावकडे (Shevgaon) निघालेल्या तीन युवकांचा दुचाकी-ट्रकच्या भीषण धडकेत (Bike and Truck Accident) जागीच मृत्यू झाला. शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटण शिवारात हा अपघात झाला. अमर रविंद्र जगधने (17), ओंकार भाऊसाहेब जगधने (19) आणि रोहित रमेश धनुरे (27, तिघेही रा. खानापूर, ता. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

तिघे एमएच 16 डीवाय 3899 क्रमांकाच्या दुचाकीवरून शेवगावकडे जात होते. यावेळी राहुरी (Rahuri) येथील कारखान्यातून ऊस खाली करून पैठणकडे (Paithan) निघालेल्या एमएच 15 एचएच 3465 क्रमांकाच्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू (Youth Death) झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही मृत्यूंची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

शनिवारी (दि. 7) खानापूर (Khanapur) येथे तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सणासुदीच्या काळात एकाच गावातील तीन युवकांचा मृत्यू झाल्याने खानापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून...

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण...