Monday, September 14, 2026
HomeनगरShevgaon : उच्चदाबाच्या वीजवाहक तारांवर चढून तरुणाचा गोंधळ

Shevgaon : उच्चदाबाच्या वीजवाहक तारांवर चढून तरुणाचा गोंधळ

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

शहरातील इंदिरानगर परिसरात न्यायालयाच्या इमारतीसमोर शनिवारी (दि. 12) दुपारी एकच्या सुमारास सुनील रामदास बर्डे (वय 25, रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) याने रोहित्रासह उच्चदाबाच्या वीजवाहक तारांवर चढून गोंधळ घातला. तो तारांना लटकून जीव देण्याची भाषा करीत असल्याने परिसरात खळबळ उडाली. वीजपुरवठा काही कामानिमित्त खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर बर्डे याला खाली उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतले. गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisement -

या बचावकार्यात नगरसेवक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस कर्मचारी प्रशांत आंधळे, आदिनाथ शिरसाठ, राहुल आठरे, आदिनाथ खेडकर, वसंत वैद्य तसेच स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. दरम्यान, पत्नी सोडून गेल्यामुळे बर्डे याने हा प्रकार केल्याची घटनास्थळी चर्चा होती. मात्र, पोलिसांच्या चौकशीत तो मतिमंद असल्याचे समोर आले असून, तो शेवगावमध्ये कशासाठी आला होता, याचा तपास सुरू आहे. त्याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून 3147 क्युसेकने विसर्ग सुरू

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याने काल सायंकाळी 11039 क्षमतेच्या धरणातून 3147 क्युसेकने विसर्ग...