Sunday, May 19, 2024
Homeनगरशेवगाव शहरात साथीचे आजार, डेंग्युचे रूग्ण वाढले

शेवगाव शहरात साथीचे आजार, डेंग्युचे रूग्ण वाढले

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण परिसरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून डेंग्युच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. असे आरोग्य यंत्रणा व नगरपालिका या दोन्ही यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष असून त्या ऐकमेकांकडे बोट दाखून निष्क्रीयपणा सिद्ध करत आहेत. याबाबत वेळीच उपाययोजना केली नाही तर डेंगीची साथ अधिक फैलावण्याची भीती व्यक्त होत आहे.

- Advertisement -

शेवगाव शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असून याचा भुरदंड नागरीकांना भोगावा लागत आहे. शहरातील काही प्रभागात अनेक दिवस कचार्‍याच्या गाड्या येत नसल्याने नागरीक ना ईलाजाने रस्ज्याच्या कडेला, पडीत भुखंडांवर कचार टाकून देत आहेत. यामुळे सर्वत्र कचर्‍याचे ढिगारे साचल्याचे चित्र आहे. पाण्याच्या पाईपालाईनचे पाणी गल्लोगल्ली रस्त्याने वाहताना दिसते. तर अनेक ठिकाणी गआरी तुंबल्या असल्याने घाण पाण्याची डबकी साचल्याचे चित्र आहे. या सर्वाच्या परिणामी शहरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव वाला आहे. पदरवर्षी पावसाळा संपला की डासांचा उपद्रव वाढतो यामुळे वेळीच त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असताना दोन्ही यंत्रणा याकडे दुर्लक्ष करतात.

मिळालेल्या माहितीनुसार शहर व तालुक्याच्या अनेक गावात डेंगुसदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला या आजाराच्या रुग्णांनी खाजगी दवाखाने खचाखच भरले आहेत. मात्र आरोग्य विभाग रुग्णांची संख्या मर्यादित असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्न करत आहे. डेंगु टाळण्यासाठीच्या उपायोजनाबांबत विचारणा केली असता पालिकेचे मुख्याधिकारी यांनी पालिका फक्त धूर फवारणी करते डेंगू फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेचे जनजागृती चे काम आहे ते आमचे नाही असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. एकंदरीत शहर व तालुक्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक खाजगी रुग्णालयात डेंगूंचे अनेक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेसह आरोग्य विभागाने तातडीने उपाय योजना आखून जनतेला दिलासा देण्याची मागणी होत आहे.

डेंग्यु रूग्णांची आकडेवारी उपलब्ध नाही

शहर व तालुक्यात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत याची माहिती संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध नाही. मागील महिन्यात 20 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी जिल्हास्तरावर पाठविण्यात आले होते. यापैकी एक जणांचा आरोग्य अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे संबंधित आरोग्य सहाय्यकाने सांगितले. मात्र इतक्या गंभिर प्रकारात रूग्णांची संख्याच माहित नसल्याने प्रभावी उपाय कसे करणार असा प्रश्न आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या