Friday, May 3, 2024
Homeनगरशेवगाव: दुहेरी हत्याकांड; एक संशयित ताब्यात

शेवगाव: दुहेरी हत्याकांड; एक संशयित ताब्यात

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शहरात मागील आठवड्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधीत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

त्याच्याकडून आणखी काही आरोपींचा सहभाग उघड होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहिती वरून पोलीस त्या गुन्हेगारांच्या मागावर असून येत्या काही दिवसांत त्यांना जेरबंद केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली.

शहरातील पाथर्डी रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळया जागेत रविवार (दि.24 जानेवारी) एका महिलेचा व मुलाचा मृतदेह आढळून होता. विशेष म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे शीर गायब असल्याने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अखेर पोलीस संशयितापर्यंत पोहचले आहे. पोलीस पथकांनी मृतदेहाजवळ सापडलेले कागदपत्रे व काही ठिकाणाच्या सीसीटिव्ही फुटेजवरून तपासाला योग्य दिशा दिली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन पथके तैनात करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांचे एक पथक मध्यप्रदेश इंदौर तर दुसरे पथक मध्यप्रदेश शिवपुरी, नरवर, गुना येथे गेले. त्यातील दुसर्‍या पथकाला संबंधित मयताच्या नातेवाईकांकडून मयताबरोबर असलेल्यांची माहिती मिळाली. त्यावरून तिसर्‍या पथकाने बिडकीन व नवगाव येथे एका संशयिताला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून हत्याकांडाशी निगडीत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या हत्याकांडातील मयतांची नावे ही ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून उघड झालेली आहेत. एकमेकांतील आर्थिक देवाणघेवाणीवरून हे हत्याकांड झाल्याचे समजते. मात्र, संशयित काही आरोपी फरार असून त्यांना पकडल्यानंतर या गुन्ह्यातील सत्यता उघड होईल.

मृत महिलेचे शीर सापडले

दुहेरी हत्याकांडातील मृत महिलेचे शीर पाथर्डी रस्त्यावरील अहिल्यानगर भागात नागरिकांना आढळून आले. पोलिसांना त्याची माहिती मिळताच ते त्यांनी ताब्यात घेतले असून प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या