Thursday, May 2, 2024
Homeनगरशेवगाव शहरात पोलीसांचे सशस्त्र संचलन

शेवगाव शहरात पोलीसांचे सशस्त्र संचलन

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलीसांनी शहरातील मुख्य मार्गावरून शस्रांसहित – शिस्तबध्द पायी संचलन करत शक्ती प्रदर्शन केले. गणेश विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे म्हणुन हे संचलन करण्यात आले.

- Advertisement -

शहरातील क्रांती चौक-शिवाजी चौक-भगतसिंग चौक – नाईकवाडी मोह्हला- वडारगल्ली – मोची गल्ली – आंबेडकर चौक – क्रांती चौक ते शेवगाव पोलीस स्टेशन पर्यंत संचलन करण्यात आले. उपविभागिय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सपोनि दिपक सरोदे, आषिश शेळके, पोसई अमोल पवार, निरज बोकीळ, शेवगाव पोलीस स्टेशनचे 20 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड व रॅपीड एक्शऩ फोर्स नवी मुंबई प्लाटुन समादेशक 102 बटालियनचे डिप्टी कमांडेंट आलोक कुमार झा, असिस्ट़ट कमांडर विशाल येरंडे, पोलीस इन्स्पेक्ट़र – एल आशाहारी, विशाल पखाले व 60 बटालयिनचे जवान या संचलनास हजर होते.

सदरचे संचलन पोलीस अधिक्षक राकेश ओला अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलादार व रॅपिड क्शऩ फोर्सचे अधिकारी व जवान यांनी संचलन केले आहे. या संचलनाने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधुन घेतले.

शहरात व तालुक्यात गणेशोत्सव शांततापुर्ण वातावरणात चालु आहे. शांतता समितीचे कार्यकर्ते व पोलीस एकमेकांच्या सहकार्यातुन हा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे. गोंधळ घालणारांची माहिती अगोदरच दिली तर पोलीस त्यांचा बंदोबस्त करतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या काळात शांतता राहण्याच्यादृष्टीने पोलीसयंत्रणा दक्ष आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नाही. या काळात पोलीस दल कोणाच्याही हस्तक्षेपाला थारा देणार नाहीत.

– विलास पुजारी, पोलीस निरीक्षक, शेवगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या