Thursday, May 22, 2025
Homeक्राईमCrime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना पकडले

Crime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना पकडले

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

तालुक्यातील पिंप्रीलौकी फाटा शिबलापूर (Shilapur) येथील कृषी सेवा केंद्राच्या (Agricultural Service Centre Theft) गुन्ह्यातील 3 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 8 लाख 57 हजार 392 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

पिंप्रीलौकी येथल संदीप पोपट गिते हे 15 मे रोजी त्यांचे कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Centre Theft) बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून त्यामधील माल चोरुन नेला होता. याबाबत आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयूर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देत रवाना केले.

सदर पथकाने बुधवारी (दि.21) गुन्ह्याचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तीन इसम हे त्यांच्याकडील पिकअप गाडीमधून (क्र.एमएच.21, बीएच.5443) अहिल्यानगर (Ahilyanagar) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जाणार्‍या रस्त्यालगत आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीचे औषधे संशयास्पद विकत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने गणेश विठ्ठल आव्हाड (वय 23, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर), राज संदीप गायकवाड (वय 24, रा. विळद, ता. अहिल्यानगर), आदित्य संतोष इंगोले (वय 23, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले.

तसेच पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीचे औषधे व रसायन मिळून आले. तसेच गुन्ह्याची कबुली देत पंचासमक्ष 8 लाख 57 हजार 392 रुपये किमतीचे कीटकनाशक, औषधे व मोबाईल असा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सोमनाथ घार्गे अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक; राकेश ओला यांची...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अडीच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले राकेश ओला (SP Rakesh Ola) यांची बदली (Transfer) बृहन्मुंबई (Mumbai) येथे...