Wednesday, October 23, 2024
HomeनाशिकNashik News : कोहोर बँकेचे स्थलांतर स्थगित

Nashik News : कोहोर बँकेचे स्थलांतर स्थगित

कोहोर | वार्ताहर | Kohor

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) ग्रामीण भागातील महत्त्वाची आर्थिक वाहिनी म्हणून समजली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्र कोहोर (शाखा क्रमांक ६६३) ही शाखा नजिकच्या करंजाळी येथील बँकऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) या शाखेत स्थलांतर करणेकामी पूढील सुचना येईपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती कोहोर बँकेच्या नोटीस बोर्डवर जाहीर केल्याने खातेधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : बँकेचे स्थलांतर थांबविण्यासाठी खातेधारकांचे आंदोलन

दि. २५ जून रोजी कोहोर बँक (Kohor Bank) स्थलांतर थांबविणेकामी खातेधारक, शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसह अबाल-वृध्दांनी बँकेसमोरच आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत बँक ऑफ महाराष्ट्राचे प्राधिकृत अधिकारी यांनी बँक स्थलांतरितचा निर्णय पूढील सुचना येईपर्यंत सदरची प्रक्रिया पूढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र कोहोर शाखेला परिसरातील जवळपास १८ ते २० ग्रामपंचायतमधील ५० ते ६० गावे जोडली आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : बेकायदेशीर मुरुम उत्खनन भोवणार? प्रांत अधिकार्‍यांकडून कारवाईची सूचना

तसेच सात ते दहा हजार पेक्षा अधिक खातेदार सभासद असून निराधार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांचे खाते आणि विशेष करून सर्व शेतकऱ्यांची खाती या शाखेत (Branch) जोडलेली आहेत. दरम्यान, नजिकच्या बँक शाखेत स्थलांतरीतचा निर्णय रद्द झाल्याने कोहोर परीसरातील खातेधारक, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांचे ३० ते ३५ किलोमीटर अंतर वाचले आहे. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान टळले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र प्राधिकृत अधिकारी यांच्या निर्णयाने कोहोर परिसरातील खातेधारक, शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या