मुंबई | Mumbai
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार (MLA) बाहेर पडल्याने शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली होती. या फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. यातील एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत…
Uddhav Thackeray : “शिवसेनेची स्थापना भाजपची…”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ज्यावेळी मला उमेदवारी (Candidacy) नाकारण्यात आली तेव्हा मी मनोहर जोशींना (Manohar Joshi) काय करु, असे विचारले. ते मला म्हणाले की, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागले. ‘मातोश्री’वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी ‘मातोश्री’वर गेलो. उद्धव ठाकरे बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तुच निवडून येऊ शकतो. तुच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत. त्यावेळी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) तिथे होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी कापलेले आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो.
G20 leaders at Rajghat : जगभरातील नेते राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक
त्यानंतर मला संजय राऊतांचा फोन आला. तेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं की, तुम्ही कुठे चालले? मला वाटलं मी मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे ते राऊतांना कशाला सांगायचं. ते मला म्हणाले की, तू मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चालला आहेस ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, उद्धव ठाकरेंकडून किंवा मातोश्रीवरून राऊतांना याबाबत कुणीतरी सांगितले असावे. राऊतांनी मला मनोहर जोशींच्या घरावर मोर्चा घेऊन चाललो आहे का विचारल्यावर मी हो चाललो आहे सर असे उत्तर दिले. त्यावर राऊत म्हणाले की, असाच जाऊ नकोस. जाऊन मनोहर जोशींचे घर जाळून टाक. काही शिल्लक ठेऊ नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे. तिथून पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका,” असं सदा सरवणकर यांनी सांगितले.
Nashik News : ‘आनंदाचा शिधा’चे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते वितरण; जिल्ह्यातील
तब्बल ‘इतक्या’ लाभार्थ्यांना मिळणार लाभ
ते पुढे म्हणाले की, ‘मातोश्री’चा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे मी मनोहर जोशींच्या घरी निघालो. तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र, तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात. घराच्या आजूबाजूला काही व्हिडीओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून जे पुढे गेलो. त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती आहे, असे सरवणकर यांनी म्हटले.
Dindori News : करंजवण, ओझरखेड भरण्याच्या मार्गावर; तीन धरणे भरली, तिसगाव ‘इतके’ टक्के
दरम्यान, आमदार सदा सरवणकर यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर यावर ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रत्युतर दिले असून ते म्हणाले की, “सदा सरवणकरांना काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारांमध्ये गेल्यावर असे २०-२५ वर्षांनी सांगत आहेत. त्याचवेळी सांगितले असते, तर बरे झाले असते, असे त्यांनी म्हटले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या