Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा हिरवा कंदील

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिंदे सरकारचा हिरवा कंदील

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनला (Mumbai – Ahmedabad bullet train)आवश्यक त्या सर्व परवानग्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून ठाकरे सरकारकडून रखडविण्यात आलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

- Advertisement -

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दादरा – नगर हवेलीतील १०० टक्के, गुजरातमधील ९८.७९ टक्के जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील १५० हेक्टर क्षेत्रापैकी ७१ टक्के जागेचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमतवाढ टाळण्यासाठी ८५ टक्के जमीन अधिग्रहित झाल्याशिवाय प्रत्यक्ष काम न करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने दिल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळात याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.

राज्यात आता भाजप- शिंदे गटाचे सरकार आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पातील असणारे अडथळे दूर करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या