Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाचा दसरा मेळावा बिकेसीवर; शिवसेनेचा अर्ज फेटाळत MMRDA ने दिली परवानगी

शिंदे गटाचा दसरा मेळावा बिकेसीवर; शिवसेनेचा अर्ज फेटाळत MMRDA ने दिली परवानगी

मुंबई | Mumbai

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

कारण बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दसरा मेळाव्यावरुन वादंग माजले आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे सभा होते, पण यंदा हे मैदान रिकामे राहणार असल्याचे बोलले जाते.

शिवसेनेने शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी आधीच परवानगी महापालिकेकडे मागितली आहे. त्यानंतर शिंदे गटाचा अर्ज दाखल करण्यात आला. मुंबई महापालिकेने या मैदानावर मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या