Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिंदेंना पक्षफुटीची भिती? ठाकरेंसोबत जे घडलं ते आपल्यासोबत घडायला नको..कार्यकारणी बैठकीत घेतला...

शिंदेंना पक्षफुटीची भिती? ठाकरेंसोबत जे घडलं ते आपल्यासोबत घडायला नको..कार्यकारणी बैठकीत घेतला मोठा निर्णय

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षापूर्वी बंडाचे निशाण फडकवले आणि पक्षात मोठी फूट पाडली. ज्या प्रकारे शिवसेनेत फूट पडली होती, तशीच फूट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पडणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असते. शिवसेनेत्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मांडलेला एक प्रस्ताव लक्षवेधी ठरला आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सोमवारी बैठक संपन्न झाली. त्यात काही महत्त्वाचे ठराव मांडले गेले. यातील शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव सर्वाधिक लक्षवेधी ठरला. उद्धव ठाकरेंना तीन वर्षांपूर्वी पक्षफुटीचा प्रचंड मोठा फटका बसला. बहुतांश आमदार, खासदारांनी त्यांची साथ सोडली. नेत्यांनीदेखील शिंदेसेनेची वाट धरली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांवर शिंदेसेनेत गेलेल्या नेत्यांनी दावे सांगितले. त्यामुळे ठाकरे आणखी अडचणीत आले. पक्ष फुटीचा फटका ज्या पद्धतींने ठाकरेंना बसला, त्या अनुशंगाने शिंदेंच्या शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात आली आहेत.

- Advertisement -

ठाकरेंसोबत घडलेला प्रकार पाहून शिंदे यांनी धडा घेतलेला आहे. भविष्यात तसा प्रकार आपल्या पक्षासोबत घडू नये यासाठी शिंदेसेनेच्या काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. पक्षाचे कार्याध्यक्ष आणि आमदार बालाजी किणीकर यांनी विश्वस्त संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला असून, संस्थेच्या माध्यमातून पक्षाच्या सर्व आर्थिक, प्रशासकीय आणि मदतीसंबंधी कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये आणि शाखा या शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेच्या अंतर्गत येतील. त्यांचे व्यवस्थापन विश्वस्त संस्थेकडून पाहिले जाईल. पक्षनिधी, गरजूंना मदत, पक्षाच्या वतीने केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमांचे आयोजन संस्थेकडून केले जाईल. पक्षाकडून केली जाणारी समाजपयोगी, लोकपयोगी कामंदेखील संस्थेकडून केली जातील.

शिवकोष’ संस्थेअंतर्गत पुढील कामे केली जाणार
राज्यभरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालये आणि शाखांचे व्यवस्थापन
पक्ष निधीचे योग्य नियोजन आणि वापर
गरजू कार्यकर्त्यांना मदतीचे वाटप
शिवसेनेच्या सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांचे नियोजन

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “मराठा समाजाला आतापर्यंत आमच्या सरकारने…”; CM फडणवीस स्पष्टच...

0
रायगड | Raigad मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवालीत उपोषणाला बसले असून, आज (मंगळवार) त्यांच्या उपोषणाचा ११ वा...