Thursday, March 13, 2025
Homeनगरशिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडींग- ना. मोहोळ

शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडींग- ना. मोहोळ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी विमानतळावर उड्डाण योजनेसह काही दिवसांतच नाईट लँडींग विमानसेवेचा प्रारंभ करण्यात येणार असून देशांतर्गत व अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.
साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली होती.

- Advertisement -

गृहमंत्री अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी शिर्डी एअरपोर्टसाठी सीआयएसएफचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. नाईट लँडींगबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून पंधरा दिवसांत शिर्डीतून विमानांची नाईट लँडींग व टेकअप सुरू करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या 6 तारखेला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमावेत मुख्यमंत्री फडणवीस व आपल्या उपस्थित शिर्डीसह राज्यभरातील विमानतळाच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे ना. मोहोळ यांनी सांगितले.

देशातील सामान्य माणसाला विमान प्रवास करण्यासाठी मोदी सरकारने 10 वर्षांत देशात विमानतळांची संख्या 75 वरून 175 वर नेली असून विमानतळावर स्वस्त दरात भाविकांना भोजन, नाश्ता देण्याची योजना कोलकत्ता विमानतळापासून सुरू केली आहे. त्याची व्याप्ती देशातील इतर विमानतळांवर वाढवणार असल्याचेही ना. मोहोळ यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...