Friday, November 22, 2024
Homeनगरपहिल्या दिवशी 813 मतदारांचे घरून मतदान

पहिल्या दिवशी 813 मतदारांचे घरून मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीत 85 वयापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग (अपंगत्व) असलेल्या व्यक्तींना घरातूनच मतदान करता येणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार (दि.7) पासून या मतदान प्रक्रियेला सुरु झाली. पहिल्या दिवशी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 365 तर नगर मतदारसंघातील 448 मतदारांनी घरून मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. अशा प्रकारे पहिल्या दिवशी नगर आणि शिर्डीतील 813 मतदारांनी घरून मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

.जिल्ह्यात 18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान होम व्होटींगसाठी मतदारांनी बीएलओकडे अर्ज केले होते. यात जिल्ह्यातील दोनही लोकसभा मतदारसंघून 1 हजार 448 मतदारांची नोंदणी झाली होती. यात नगरमधून 748 तर शिर्डीतून 700 मतदारांचा समावेश होता. या मतदारांसाठी 7 आणि 8 मे रोजी घरून मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोनही दिवशी घरी न सापडणार्‍या अथवा रुग्णालयात दाखल असणार्‍या मतदारांसाठी पुन्हा 9 मे रोजी विशेष प्रक्रिया (घरून) राबवण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियोजनानूसार मंगळवार (दि.7) रोजी पहिल्या दिवशी नगर लोकसभा मतदारसंघातून 400 ज्येष्ठ नागरिकांनी व 48 दिव्यांग व्यक्तींनी मतदान केले. तर शिर्डीत 307 ज्येष्ठ नागरिक व 58 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्या दिवशी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघातील 813 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून आज दुसर्‍या दिवशी ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 13 मे रोजी नियमित मतदान प्रक्रिया होणार आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ
अकोले 60 ज्येष्ठ नागरिक आणि 11 दिव्यांग, संगमनेर 68 ज्येष्ठ नागरिक आणि 16 दिव्यांग, शिर्डी 46 ज्येष्ठ नागरिक आणि 7 दिव्यांग, कोपरगाव 44 ज्येष्ठ नागरिक आणि 13 दिव्यांग, श्रीरामपूर 44 ज्येष्ठ नागरिक 7 दिव्यांग नेवासा 45 ज्येष्ठ नागरिक व 4 दिव्यांग असे 307 ज्येष्ठ नागरिक व 58 दिव्यांग यांचा समावेश आहे.

नगर लोकसभा मतदारसंघ
नगर 101 ज्येष्ठ नागरिक आणि 7 दिव्यांग, पारनेर 44 ज्येष्ठ नागरिक आणि 4 दिव्यांग, श्रीगोंदा 59 ज्येष्ठ नागरिक आणि 14 दिव्यांग, कर्जत-जामखेड 78 ज्येष्ठ नागरिक आणि 8 दिव्यांग, शेवगाव-पाथर्डी 39 ज्येष्ठ नागरिक 5 दिव्यांग, राहुरी 79 ज्येष्ठ नागरिक व 5 दिव्यांग असे 400 ज्येष्ठ नागरिक व 48 दिव्यांग यांचा समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या