Tuesday, September 29, 2026
Homeनगरअशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; नाशिक कारागृहातून आणून चौकशी सुरु

अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; नाशिक कारागृहातून आणून चौकशी सुरु

शिर्डी (प्रतिनिधी)

राहाता येथील पतसंस्थेच्या शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर त्याला पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

बनावट कागदपत्रांच्या आधारे काही व्यक्तींच्या नावाने खाती उघडण्यात आल्याचा आरोप आहे. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची बाब तपासात समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरात व संबंधित शाखा व्यवस्थापकासह अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान अनेक खातेदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. काहींनी आपल्या नावाने खाते उघडल्याची माहिती नसल्याचे सांगितले असून त्याआधारे पोलिसांकडून कागदपत्रे, केवायसी प्रक्रिया आणि व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

अशोक खरात याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे नेमके स्वरूप, बोगस खाती उघडण्यामागील सूत्रधार, व्यवहारात सहभागी असलेले इतर संशयित तसेच पतसंस्थेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका याबाबत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर ‘एफडीए’ची कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सुमारे दोन हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करणार्‍या शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील सावता केटरर्सकडे अन्न...