Monday, July 27, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत 23 व 24 ला संरक्षण उत्पादनाचे प्रदर्शन

Shirdi : शिर्डीत 23 व 24 ला संरक्षण उत्पादनाचे प्रदर्शन

नागरिकांना रॉकेट आणि क्षेपणास्त्र पाहाण्याची संधी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यानिमिताने 23 आणि 24 मे रोजी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये रॉकेट आणि क्षेपणास्त्र विशेष आकर्षण असणार आहेत.

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सावळीविहीर येथील औद्यगिक वसाहतीमध्ये निबे गृपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भविष्यात ओळखला जाईल. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफ गोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे.संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे.

या निमित्ताने 23 व 24 मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यासाठी मोठे स्टॉल प्रकल्पस्थळावर उभारण्यात आले आहेत. विद्यार्थी विज्ञानप्रेमी, नागरिक, महिला या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी जाणून घेण्याची ही मोठी संधी निर्माण करुन देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Crime News : एक कोटींच्या लुटीच्या कटात दोन पोलिसांसह तोतया पत्रकाराचा...

0
पुणे | प्रतिनिधी | Pune पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलावर भरदिवसा एका मोठ्या व्यावसायिकाला लुटण्याचा चित्रपटालाही लाजवेल असा थरार घडला असून, याप्रकरणी पुणे...