Thursday, May 2, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळावरुन दिल्ली विमानसेवा सुरु

शिर्डी विमानतळावरुन दिल्ली विमानसेवा सुरु

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) –

गेल्या सात महिन्यांपासून शिर्डी विमानतळवरुन जवळजवळ विमानसेवा बंद होती. ती सेवा आता हळुहळु सुरु होऊ लागली आहे. 27 आक्टोबरपासून

- Advertisement -

दिल्ली विमानसेवा दिवसाआड सुरु झाली आहे.

मार्च महीन्यापासुन करोनामुळे विमानसेवा बंद होती. शिर्डी विमानतळ साईबाबांच्या मंदीरावर मोठ्या प्रमाणात अंबलंबुन आहे. अनलाक झाले तरी अजुन मंदीर बंद आहे. त्यामुळे मंदीर बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाही. पर्यायाने विमानसेवेवर परीणाम झाला आहे. इतर ठिकाणची विमानतळे बर्‍यापैकी सुरु झाली आहेत. तुलनेने शिर्डी विमानतळ मंदीर उघडल्यावरच चांगले उड्डाण घेईल. सध्या 27 तारखेपासुन या विमानतळावरुन दिल्ली विमानसेवा दिवासाआड सुरु झाली आहे. सुमारे 20 ते 25 प्रवासी या विमानाने येजा करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या