राहाता | प्रतिनिधी | Rahata
शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदारसंघात सकाळी ७ ते ९ या दोन तासात सहाही विधानसभा मतदारसंघात सरासरी ६.४१ टक्के मतदान (Voting) झाले. मतदा्रांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह दिसत नाही.
- Advertisement -
आज सकाळी ७ वाजता प्रत्येक्षात मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण भागात किरकोळ अंतरात रांगा दिसून आल्या. सकाळी ९ अखेर अकोले विधानसभा मतदारसंघात ६.५ टक्के, संगमनेर १०.८७ टक्के, शिर्डी ५.८५ टक्के, कोपरगाव ५.११ टक्के, श्रीरामपूर ५.१७ टक्के, तर नेवासा ५ टक्के असे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी पहिल्या दोन तासात ६.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीत मतदानाचा हक्क बजावला.
महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत मतदान केले.