Thursday, July 23, 2026
Homeक्राईमRahata : शिर्डीत 29 लाखांच्या मुद्देमालासह 4 हजार किलो मांगूर मासे जप्त

Rahata : शिर्डीत 29 लाखांच्या मुद्देमालासह 4 हजार किलो मांगूर मासे जप्त

राहाता |प्रतिनिधी| Rahata

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शिर्डी पोलीस ठाण्याच्या (Shirdi Police Station) हद्दीत निमगाव बायपास रोडवर मोठी कारवाई करत, केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले तब्बल 4 हजार किलो मांगूर मासे (Mangur Fish) आणि ट्रक असा एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिपक मेढे व त्यांच्या पथकाला माहिती मिळाली की, पश्चिम बंगालमधून एक ट्रक (क्रमांक डब्लु बी.25 एम. 5023) प्रतिबंधित मांगूर मासे (Mangur Fish) घेऊन नगर-मनमाड हायवेवरून (Nagar Manmad Highway) मुंबईच्या दिशेने जात आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे व त्यांच्या टीमला सोबत घेऊन निमगाव बायपास चौक येथे सापळा रचला आणि संशयित ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक मधील स्वपन नियम डे, मकबुल रौफ सरदार, कुतुब आयुब मंडल, मृत्युंजय मुकुल विश्वास (सर्व रा. पश्चिम बंगाल) या चार आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हे मासे पश्चिम बंगालमधील एका मिराज नामक व्यक्तीने भरून दिले असून, ते खोपोली (मुंबई) येथील एका भाई नावाच्या व्यक्तीकडे नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, हे मासे मानवी आरोग्यास घातक आणि केंद्र सरकारने प्रतिबंधित (Restricted) केलेले थाई मांगूर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 4 लाख रुपये किमतीचे 4000 किलो मासे आणि 25 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे प्रतिबंधित मासे नष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 275, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...