Wednesday, November 11, 2026
Homeनगरशिर्डीत रिक्षाचालक कागदपत्रे तपासणी मोहीम सुरु; शिर्डी पोलिसांना आली उशिरा जाग

शिर्डीत रिक्षाचालक कागदपत्रे तपासणी मोहीम सुरु; शिर्डी पोलिसांना आली उशिरा जाग

शिर्डी (प्रतिनिधी)

शिर्डी शहरात औषध उपचारासाठी आलेल्या एका रुग्णास व नातेवाईकास रिक्षा चालकाने मारहाण करून आर्थिक लुटीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शुक्रवारी सकाळपासून रिक्षा, अपे रिक्षा या वाहनांची मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे.

- Advertisement -

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मुका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर उपनिरीक्षक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर सुरू होती.

शिर्डी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षा विना कागदपत्रे, विना लायसन, पियुसी नसणे, चालकांची क्राईम पडताळणी, इन्शुरन्स परमीट विना गणवेश, नो पार्किंग, प्रदुषण करत असलेल्या जुनाट परजिल्ह्यातील पासिंग रिक्षा असलेल्या विविध वाहनावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शिर्डी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू करताच नेहमी गजबजलेल्या नगर मनमाड रोड पूर्णपणे मोकळा दिसत होता.

शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत्या रिक्षांची संख्या त्यातून काही रिक्षा चालक साईभक्त भाविकांची आपल्या फायद्यासाठी आर्थिक लूट करत असल्याने स्थानिक ग्रामस्थ व साईभक्तांच्या तक्रारीवरून ही मोहीम सुरू करण्यात आली असून या पुढील काळात देखील ही मोहीम यापुढे ही सुरू असणार असून रिक्षा चालक, चार चाकी वाहने, लक्झरी बसेस यांनी व्यवसाय करताना नियमाचे पालन करून व्यवसाय करावा अन्यथा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षासह इतर वाहनाबरोबर चालकांवर देखील अशीच कारवाई या पुढच्या काळात देखील सुरू राहील, असा इशारा शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी दिला. या कारवाईत वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

शिर्डीत वाहतूक शाखेने या अगोदर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणीची मोहीम हाती घेतली असती तर भाविकांची लूट करण्याचा प्रकार कमी झाला असता एखादी घटना झाल्यानंतर पोलीस खाते जागे होते अशी चर्चा देखील शिर्डी नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...