Tuesday, January 6, 2026
HomeनगरShirdi Crime News : तरुणाचा खून करुन मिळालेला मोबाईल विकून साजरा केला...

Shirdi Crime News : तरुणाचा खून करुन मिळालेला मोबाईल विकून साजरा केला वाढदिवस

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने रस्त्याने पायी जाणार्‍या तरुणाचे अपहरण करून त्यांच्याकडुन पैसे व मोबाईल काढुन घेण्याचे उद्देशाने त्याला गाडीवर बसवुन तालुक्यातील नांदुर्डी शिवारातील ऊसाच्या शेतात नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खून करुन त्याच्या खिशातील मोबाईल काढून तो विक्री केला. याबाबत शिर्डी पोलिसांनी 7 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
गणेश सखाहरी चत्तर (वय 42 वर्षे रा. हांडेवाडी रोड चासनळी ता. कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण 8 जून पासून घरातून बेपत्ता झाला होता. नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाचे शेतात एका अनोळखी इसमाचे बेवारस प्रेत मिळुन आले होते.

- Advertisement -

याबाबत शिर्डी पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला असता मयत तरुणाच्या पाठीवर धारदार शस्राने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकार्‍यांनी 13 जून रोजी पोलिसांना दिला. बेपत्ता मयत झालेला तरूण हा कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. मयताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला 4 हजार 500 रुपयांना विकला व त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवसाची पार्टी केली. दुकानदारांकडून हा चोरीचा मोबाईल यातील एका मुलाने विकत घेऊन चालू केल्याने ही खुनाची घटना उघडकीस आली.

YouTube video player

आम्ही सर्वांनी मिळुन गणेश चतर यांना ऊसाने, हाताने मारहाण करुन त्यातील एकाने गणेश चत्तर यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकु घेऊन त्या चाकुने पाठीवर भोसकुन गंभीर जखमी केले व त्यानंतर त्याचे खिशातील मोबाईल काढुन घेऊन गेलो. मृतदेह ऊसाच्या शेतात कुजून गेलेल्या अवस्थेत मिळुन आला होता. सदरचा मोबाईल 4 हजार 500 रुपयांना विकल्याची कबुली व पैशाच्या उद्देशाने या तरुणाचा खून केल्याची कबुली या घटनेतील मुलांनी पोलिसांना दिली. यातील काही अल्पवयीन मुले हे नशेत होते त्यांच्याकडे मद्याच्या क्वार्टर मिळुन आल्याचे गलांडे यांनी सांगितले. याबाबत पोलिस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी या 7 अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या विधीसंघर्षीत मुलांना आज (रविवारी) अल्पवयीन मुलांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...