Friday, January 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना; पुर्वमध्ये इस्लाम पार्टीचे वर्चस्व

मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना; पुर्वमध्ये इस्लाम पार्टीचे वर्चस्व

भाजप-एमआयएमला मतदारांनी नाकारले

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -


महानगरपालिका २१ प्रभागातील ८४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पश्चिम भागात १८ जागा जिंकत शिवसेनेने तर पुर्व भागात ३५ जागा पटकावत इस्लाम पार्टीने दणदणीत यश संपादन केले आहे. सत्तेवर येण्याचा दावा करणार्‍या भाजपसह एमआयएमला मतदारांनी नाकारल्याने दारूण पराभवाचा सामना करावा लागला. एमआयएमला २१ तर भाजपला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.

YouTube video player

समाजवादी ५ व काँग्रेस पक्षाचे ३ नगरसेवक विजयी झाले. बहुमतासाठी आवश्यक ४३ हा जादुई आकडा गाठण्यास इस्लाम-समाजवादी आघाडीस अवघ्या ३ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने मनपावर इस्लाम पार्टीची सत्ता राहणार असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.


८ वर्षाच्या कालखंडानंतर होत असलेली महानगरपालिका निवडणूक सर्वच पक्षांतर्फे प्रतिष्ठेची करण्यात आली होती. ८३ जागांसाठी पक्ष व अपक्ष असे ३०१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या दणदणाटामुळे प्रचार शिगेला पोहचविण्यात आला होता. तसेच मतदानासाठी देखील सर्वच पक्षनेते-पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे मोर्चेबांधणी केली गेल्याने ६४.८ टक्के मतदान नोंदविले गेले होते.

आज चार ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडून निकाल घोषीत केले गेले. अपेक्षेप्रमाणे पश्चिम भागात २४ पैकी १८ जागा जिंकत शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखीत केले. तर पुर्व भागात इस्लाम पार्टीने तब्बल ३५ जागा जिंकत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. इस्लामबरोबर आघाडी करणार्‍या समाजवादी पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले असल्याने मनपात या आघाडीचे संख्याबळ ४० झाले आहे.


स्वबळाचा नारा देत निवडणुकीस सामोरे जाणार्‍या भाजपच्या नेत्यांना पश्चिम भागातील जनतेने नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. २५ जागा लढविणार्‍या भाजपचे अवघे दोन नगरसेवक स्वकर्तृत्वावर निवडून आले असल्याने हा पराभव पक्षाच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून टाकणारा ठरला आहे. एमआयएम सत्ता स्थापन करेल असा दावा आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला होता. मात्र ५६ पैकी अवघे २१ नगरसेवक निवडून आल्याने जनतेने हा दावा फोल ठरविला.

ताज्या बातम्या

भाजपच्या विजयी उमेदवारला मारहाण

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad जेलरोड येथील प्रभाग 18 मधील भाजप च्या विजयी नगरसेवकाला अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की...