Thursday, May 2, 2024
Homeनाशिकशिवसेना पदाधिकार्‍यांचा मुख्याधिकार्‍यांसमोर समस्यांचा पाढा

शिवसेना पदाधिकार्‍यांचा मुख्याधिकार्‍यांसमोर समस्यांचा पाढा

ओझर। वार्ताहर | Ojar

येथील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदेसाठी (Municipal Council) शासनाने नियुक्ती केलेले ओझर नगरपरिषदेचे (Municipal Council) मुख्याधिकारी किरण देशमुख (Chief Officer Kiran Deshmukh) यांची ओझर शिवसेना युवासेना (Shiv Sena Yuvasena) पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत येथे होणार्‍या अनियमित पाणीपुरवठ्या (Irregular water supply) बाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकार्‍यांना विचारणा करुन चर्चा केली.

- Advertisement -

यावेळी पाणी वाटप करतांना जीवन प्राधिकरणाचे अधिकार्‍यांकडून वेगळेच ‘अर्थकारण’ केले जाते की काय असा संशयही शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. येथील तत्कालीन ग्रामपंचायत ते आताचे नगरपरिषद प्रशासन (Municipal administration) ओझरसह परिसरातील रहिवाशांकडून पाणी बिल पूर्ण महिनाभराचे वसुल करते. परंतु त्या मोबदल्यात महिन्यातील सात ते आठच दिवस पाणीपुरवठा (Water supply) केला जातो आणि तो ही अनियमित व पूर्वसूचना न देता. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी देशमुख यांची भेट घेवून येथील समस्या त्यांचेसमोर मांडल्या. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी धर्मराज अलगट उपस्थित होते.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने ओझरकर नागरिकांना एक दिवसाआड व नियोजित वेळेत पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. ओझर, जानोरी, मोहाडी आणि साकोरे या गावांसाठी आधीची पाणीपुरवठा योजना होती. त्यात नव्याने जऊळके गावाचा समावेश करण्यात आला आहे. तसेच याच लाईनवरून जानोरी, जऊळके येथील एमआयडीसी (MIDC) मधील कंपन्यांना पाणी दिले जात आहे. जीवन प्राधिकरण अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे 57 लाख लिटर आणि त्याच्या बरोबरच प्राधिकरणाचे पंपिंगचे पाणी असे 60 लाख लिटर पेक्षा जास्त पाणी दिले जाते.

परंतु 38 लाख लिटर क्षमतेची ओझरला पाण्याची टाकी असतांनाही टाकी ही भरली जात नाही मग शिल्लक असलेले पाणी मुरते कुठे हा मोठा प्रश्न असून तो ही अनुत्तरित राहत आहे. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश महाले, शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत पगार, शहरप्रमुख नितीन काळे, युवासेना तालुका प्रमुख आशिष शिंदे, उपविभाग प्रमुख नरेंद्र थोरात, अनिल सोमासे, स्वप्नील कदम, महेश शेजवळ, उपशहर प्रमुख सूरज शेलार, महेश शेजवळ, खलील सैय्यद, पाणीपुरवठा कर्मचारी सचिन कदम, राजेश संगपाळ आदींसह ओझर परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओझर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 24 तास पंपिंग केले जाईल. येथील नागरिकांवर अन्याय होणार नाही यासाठी इतर गावाच्या ग्रामपंचायतींना सहकार्य करण्यासाठी विनंती करणार आहे.

– डी.आर. अलगट, उपविभागीय अधिकारी (प्र) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन

पाणी पुरवठा दुसरीकडे ओझर गावासाठी होणार पाणीपुरवठा अनियमित होत असून यास कुठेतरी अर्थकारण ची किनार आहे. आमच्या हक्काचे पाणी इतर कंपन्यांना दिले जाते आणि पाईपलाईन दुरुस्ती च्या नावाखाली पाणी दुसरीकडे वळवले जात आहे असा दाट संशय निर्माण होतो. कारण त्याच साठवण धरणातून पिंपळगावला नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. ही एमजीपी अधिकार्‍यांची वागणूक संशयास्पद आहे.

– प्रकाश महाले, शिवसेना उपतालुका प्रमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या