Friday, September 20, 2024
HomeराजकीयSanjay Raut : लोकसभेला काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी...

Sanjay Raut : लोकसभेला काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर…; संजय राऊतांनी फटकारलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahavikas Aaghadi and Mahayuti) नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका होत आहेत. या सभांच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरै सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून (CM Post) उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशातच काल काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार असे विधान केले होते. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : Eknath Shinde : ‘एक देश, एक निवडणुकी’च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये अजून जागावाटप बाकी आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर कुणाला मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशी खुमखुमी असेल तर ती महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत उतरवून दाखवेन, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत आणखीच वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

संजय राऊत म्हणाले, तिसरी आघाडी झाली तर ती केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. कारण ही आघाडी विरोधकांची मत फोडेल. महाविकास आघाडीची आज जागा वाटप बैठक होत आहे. लोकसभेच्या जागावाटपावेळी कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक अमरावतीची जागाही आम्ही त्यांना सोडली. काँग्रेस नेते जर ते विसरत असतील तर हे योग्य नाही. वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका घेणार नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावं लागेल. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. जर तो आत्मविश्वास वाढला तर अभ्यासाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटप करणे सोपे होते. आज आमची सर्वांना सामावून घेण्याची भूमिका आहे.

हे देखील वाचा : Nashik News : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभेसाठी जिल्ह्यातील ‘या’ दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर

दरम्यान, बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, तिसरी आघाडी हे कायमच सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. जे राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतात ते तिसरी आघाडी बनवून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवतात, हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये विधानसभेची लढत आहे,पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे असेही संजय राऊतांनी म्हंटल.

यावेळी संजय राऊतांनी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूनही निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि जातात. आपण नक्की कसलं उद्धाटन केलंय हे देखील त्यांना माहिती नसतं, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. खरंतर या राज्याच्या संदर्भात भाजप डळमळीत आणि अस्थिर झाला आहे. औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेला आहे. आजही इथले उद्योग गुजरातला जातायत. त्याचं सर्वस्वी कारण म्हणजे नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात. उद्योगाचे काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

- Advertisment -

ताज्या बातम्या