अहिल्यानगर (प्रतिनिधी)
विवाहित तरूणीला मदतीचं आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे (रा. अहिल्यानगर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, किरण काळे याने 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत त्याच्या चितळे रोड येथील ऑफिसमध्ये तिला तिच्या पतीकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्यासाठी मदतीचं आमिष दिलं. मात्र त्या विश्वासाचा गैरफायदा घेत, संशयित आरोपीने तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
या प्रकारानंतर पीडितेला धमकी देत संशयित आरोपीने तिला “जर हे कुणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही,” असे म्हणत शिवीगाळही केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी किरण काळे यांना ताब्यात घेतले आहे.




