पुणे । Pune
एकतर तू नाही तर मी, असं विधान मी केलं होतं. अनेकांना वाटलं मी त्यांना बोललो. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. माझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीयस, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नाव न घेता फडणवीसांवर (Devendra fadnvis) टीका केली आहे. शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतला. तसेच या मेळाव्यातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी,अमित शाह यांच्यावरही चौफेर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
हे ही वाचा : छंदावरून राजकीय वातावरण धुंद! थोरात व विखे यांची एकमेकांविरोधात जोरदार टोलेबाजी
मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष. ढेकणाला कधी आव्हान दिलं जात नाही, ढेकणं चिरडायची असतात. कुणीतरी हे आव्हान स्वतःवर घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या नादाला लागू नका. मी म्हणतो, तुझ्या नादाला लागण्याएवढ्या किंमतीचा तू नाहीच आहेस. असा हल्ला ठाकरेंनी फडणवीसांवर चढवला.
तसेच यावेळी अहमद शाह अफदालीचा वंशज म्हणून त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख केला. प्रत्येकवेळी गद्दरानी आपला घात केल्याचे ते म्हणाले. मेहबूबा मुफ्ती, नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत ?तुम्ही त्यांच्यासोबत गेलं तर चालते, अशी टीका त्यांनी केली. भाजपचा सत्ताजिहाद सुरु असून सत्तेसाठी वाट्टेल ते सुरु असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा : पवारांचा नाद करू नका; खा. लंकेंचा इशारा नेमका कोणाला?
गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. लोकसभेला कुठे कुठे फटके पडलेत ते बघायला.अहमदशा अब्दालीचा वंशज अमित शाह पुण्यात आला होता.आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणाल्याची टीका ठाकरेंनी केली. भाषणावेळी देवरसांच्या पत्राचा दाखला उद्ध व ठाकरेंनी दिला. बाळासाहेब देवरस यांनी तत्कालीन इंदिरा गांधींना पत्र लिहिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमांचा द्वेष करत नाही असं त्यांनी म्हटलं होतं.भाजपच्या अब्दालीला संघाचे विचार मान्य नाहीत का ? असा प्रश्न त्यांनी विचारला. खुर्चीचा मोह कसा असतो हे देवरस यांनी त्यावेळी लिहून ठेवलंय, हिंदू हा विश्वासघात करणारा नाही, इतरांची घर जाळायला आम्हाला छत्रपतींनी शिकवलं नाही, असे ते म्हणाले.