Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

अभिनेता गोविंदा प्रचाराच्या मैदानात

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अभिनेता गोविंदा यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत शिंदे गटाचे मंत्री आणि बहुतांश खासदार यांचा समावेश आहे.

- Advertisement -

शिंदे गटाचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, संजय राठोड, भरतशेठ गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, माजी मंत्री दीपक सावंत, शहाजीबापू पाटील, मनीषा कायंदे नीलेश राणे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

YouTube video player

याशिवाय संजय निरुपम, राजू वाघमारे, ज्योती वाघमारे, पूर्वेश सरनाईक, राहुल लोंढे, अक्षय महाराज भोसले, समीर काझी, शायना एन. सी. यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...