Thursday, May 2, 2024
Homeनाशिक...तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात सेना स्टाईल आंदोलन

…तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात सेना स्टाईल आंदोलन

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर (Bhagur), लहवीत (lahavit), लोहशिंगवे (Lohashingve), वंजारवाडी (Wanjarwadi) या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे…

- Advertisement -

या रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना (Shivsena Style) स्टाईलने आंदोलन (Agitation) करण्याचा इशारा शिवसेना एकलहरे गट प्रमुख व लहवितचे उपसरपंच निवृत्ती मुठाळ (Nivrutti Muthal) यांनी दिला आहे.

देवळाली विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) दुर्लक्ष होत आहे. भगूर ते लहवीत, लोहशिंगवे, वंजारवाडी हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळा संपत आलेला असतानाही त्याची कुठेही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

पहिल्यांदाच ‘मुक्त’चे तीन लाख पदवी प्रमाणपत्र ‘डिजिलॉकर’वर

रात्री अपरात्री येथून वाहतूक (Transportation) करणाऱ्यांचे छोटे-मोठे अपघात (Accident) हे दररोज घडत असतात याबाबत वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पंचक्रोशीतील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकप्रतिनिधींनी तातडीने या भागाची पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य द्यावे, मागणी ग्रामस्थांनी केली आहे.संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास व जनतेची मागणी विचारात न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा निवृत्ती मुठाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आणखीही ताज्या बातम्या वाचण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथे

- Advertisment -

ताज्या बातम्या