राहुरी येथील कार्यक्रमात माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत जोरदार बॅटींग केली. काय म्हणाले ते…
– कारखानदारांची बँक शेतकर्यांची करण्याचा प्रयत्न केला
– जिल्हा बँकेत शेतकर्यांसाठीचं काम काहींना मान्य नव्हतं
– मला चोर ठरवता की शेतकर्याला याच ‘तुमचं’ गणितच मला कळनां
– संगमनेरपासून पाथर्डीपर्यंत 100 कोटीवर कर्ज देण्याचं काम कोणत्या नियमात बसत होतं?
– ‘त्या’ दूध संघालाही 85 कोटीचं कर्ज दिलं
– कारखानदारांना जाब विचारणार आहे
– राहुरी कारखान्यामुळे जिल्हा बँक तोट्यात कशी आली, याची खोलात चौकशी आता गडाख साहेबांनी करावी
– जिल्हा बँकेचा अध्यक्ष-उपाध्यक्ष कोणीही होवो, मी तेथे आहे
– कारखाना बंद पाडण्यासाठी काहींचे देव पाण्यात
– कारखानदार शंभर-शंभर कोटी बेकायदेशीर घेतात अन् कुठे खर्च करतात याचा मलाही सुगावा लागलेला नाही
-गैरसमज पसरवू नका, मी राहुरीतूनच लढणार
– माझ्या पराभवासाठी मंत्र्यांनी लाखो रूपये दिले
– आमच्या पराभवात विखेंचा हात नाही
– विखे साहेब आम्हाला बांधून घ्या, मग गद्दारी झाली तर बोला
– पण विखेंच्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना समजून सांगण्याची वेळ आली आहे
– विखेंचं राजकारण चालवायचं की संपवायचे, हे आधी समर्थकांना विचारून घ्या
– जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आली असती पण ‘तुमच्या’ चमच्यांमुळे ती हातून गेली
– ‘तुम्ही’ही चाहाला पहिले ‘त्यांच्याकडे’ जातात म्हणून कुचंबणा होते
– कोपरगावात नातेवाईकांना सांगा, कोल्हेंशी पटत नसेल तर जाऊ नका पण काळेंकडेही जावू नका
– तनपुरेंकडे हेलपाटे मारणार्याला गाडीत घालून हिंडू नका
– यादी करा अन् त्यांना एकदा विळद घाटात बोलवा
– मग जिल्हा कसा निट करायचा हे आपण ठरवू
– ‘असं’ घडल आणि जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात नाही आली तर राजकारण सोडून देईल
– मी बरोबर असलो तर जेलमध्ये खासदार साहेबाला कुठलीही अडचण येवू देणार नाही
– पण तुम्हाला काय गरज आहे तनपुरेंचा सत्कार करायची?
– ‘तुमच्या’ हिटलीस्टवर मी असलो म्हणजे माझा कार्यक्रम होईल
माजी आ.शिवाजी कर्डिले यांचे अनकट भाषण ऐका संपूर्ण…