उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को मैदानात मेळावा झाला. या मेळाव्यासाठी फक्त मुंबई महानगर प्रदेशातील शिवसैनिकांना निमंत्रित करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीतील यशाने शिंदे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या मेळाव्यात मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दसरा मेळाव्यास संबोधन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. म्हणून राज्यातील शिवसैनिकांना मी आवाहन केले होते की राज्यातून सर्व शिवसैनिकांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याची गरज नसून तुम्ही फक्त आपदग्रस्तांच्या बांधावर जाऊन मदत करावी व या मेळाव्यासाठी फक्त मुंबई महानगर प्रदेशातील शिवसैनिकांना निमंत्रित करण्यात आले. आम्ही शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत केली. मदतीचे धोरण हेच शिवसेनेचे तोरण असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे. असे ठोक पणे सांगितले. लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. असे ठाम पणे सांगत एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हेच आमचे हिंदुत्व असल्याचे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.
निवडणुकी बाबत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा जिंकली तर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक देखील महायुती जिंकेल असे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केले.




