Friday, May 3, 2024
Homeनगरनगर शहरातील शिवसेना नेता, 90 कामगारांना करोना

नगर शहरातील शिवसेना नेता, 90 कामगारांना करोना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील शिवसेनेच्या नेत्यालाही करोनाची लागन झाली आहे. या नेत्याच्या पत्नीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला.

- Advertisement -

कधीकाळी महापालिकेत शिवसेनेचे नेतृत्व केलेला हा नेता आता घरातच क्वारंटाइन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीतील 90 कामगारांनाही करोनाची बाधा झाली आहे.

करोनाने आता सामान्यांसोबतच प्रतिष्ठीतांनाही घेरले आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा कोणताच भेदभाव करोनासमोर नाही. त्यामुळेच आता राजकीय नेत्यांनाही करोनाने घेरल्याचे समोर येत आहे.

कधीकाळी महापालिकेत शिवसेनेचे नेतृत्व केलेल्या या नेत्याचा करोना रिपोर्ट काल गुरूवारी पॉझिटिव्ह निघाला. 63 वर्षीय नेत्याला सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी अडमीट न होता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू केले आहेत. त्यांच्या पत्नीची टेस्ट करण्यात आली होती, त्या मात्र निगेटिव्ह निघाल्या आहेत.

नगर एमआयडीसीतील एका कंपनीतील 90 कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्टचे उत्पादन या कंपनीत केले जाते. या कंपनीत 220 कर्मचारी परमानंट असून 45 जणांचा ऑफिस स्टाफ आहे.

याशिवाय टेम्पररी कर्मचारीही आहेत. या कंपनीती 165 कर्मचार्‍यांची करोना टेस्ट केली असता त्यातील 90 बाधित निघाली तर 75 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नगर शहरातील एका नॅशनलाईज बँकेच्या सावेडी शाखेतही करोनाचा शिरकाव झाला आहे. या बँकेतील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 12 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पाईनलाईन रोड, नानाजीनगर येथेही करोनाचे नव्याने बाधित आढळून आले आहेत. बुर्‍हाणनगरमध्ये पुन्हा दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 30 वर्षाची महिला व 11 वर्षाच्या मुलास करोनाची बाधा झाली आहे.

स्टेशन रोडच्या कुटुंबात पाच

केडगावमधील आयोध्यानगरात 33 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे. स्टेशन रोडवरील एकाच कुटुंबात पाच जणांना करोना झाला आहे. पत्नी, दोन मुले आणि आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तारकपूरमध्येही 81 वर्षींय महिलेला करोनाची बाधा झाली. माळीवाड्यातही एकाच कुटुंबातील दोघांचा बाधा झाली आहे. आनंदीबाजार, दिल्लीगेट, तेलीखुंट, बुरूडगाव रोड, खिस्तगल्ली, मुथा मळा, विनायकनगर, सर्जेपुरातही करोनाचे नवे बाधित आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या