Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut:शिवसेना-मनसे युतीची घोषणा कधी होणार? "तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता आहे ती...

Sanjay Raut:शिवसेना-मनसे युतीची घोषणा कधी होणार? “तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता आहे ती घोषणा”…संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai
मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होऊन आगामी निवडणुकीसाठी त्यांची युती होणार का, हाच प्रश्न सामान्य मतादारांना पडला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक आहे, मात्र राज वा उद्धव ठाकरे या दोघांनकडूनही अद्याप युतीची घोषणा झालेली नाही. सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू असून, लवकरच ठाकरे बंधू युतीची घोषणा करत जाहीरानामाही जाहीर करतील अशी माहिती समोर आली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांश बोलताना स्पष्ट सांगितले आहे.

तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता आहे ती घोषणा होईल
‘मी कालही सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून, मुंबई महत्त्वाची आहे. मंगळवारी आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेच आज या चर्चेला पूर्णविराम मिळेल. मंगळवारी सायंकाळनंतरही मनसे आणि शिवसेनेचे नेते अंतिम निर्णयासाठी बसले आणि आज (बुधवार, १७ डिसेंबर २०२५) हा विषय. संपायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण- डोंबिवली, पुणे, नाशिक इथेसुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. येत्या १ २ दिवसात सर्व चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चेसाठी बसतील आणि तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता आहे ती घोषणा होईल’, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

आमच्यात कोणताही विसंवाद नाही
काहीही झाले तरी आमच्यात कोणताही विसंवाद, गोंधळ नाही, महायुतीमध्ये जे चालले आहे, तसे आमच्याकडे अजिबात नाही. आमचे घर दोघांचे आहे अस म्हणत राऊतांनी महायुतीला टोला लगावला. आता काँग्रेस सोबत नाही, त्यांना स्वबळ दाखवायचे आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा होईल. पण शिवसेना आणि मनसे हे मुख्य पक्ष आहेत, त्यांची आघाडी होईल. आणि हीच आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करेल. महाराष्ट्र आणि मुंबईला जाग आणण्याचे काम ही आघाडी नक्की करेल, असा विश्वासह राऊत यांनी व्यक्त केला.

YouTube video player

युतीची घोषणा कशी करावी यावर चर्चा सुरु
युतीच्या घोषणेसमयी शक्तीप्रदर्शन होईल का, असा प्रश्न विचारला असता, ‘शक्तिप्रदर्शन नक्की होईल. कारण, शक्तिप्रदर्शनाची गरज नाही असे हा शब्द योग्य वाटत नाही. उगाच दंडावरच्या गडक्या दाखवायच्या असे नाहीये… पण, जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा मुंबईतला मराठी माणूस तिथे ओसंडून वाहताना दिसेल. अर्थात जागावाटप आणि युतीची घोषणा कशी करावी मेळावा की पत्रकार परिषद याची चर्चा सुरू आहे’ अशी माहिती राऊतांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...