Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याअपक्षांना पाठिंबा नाहीच, मग तो कुणीही असो; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

अपक्षांना पाठिंबा नाहीच, मग तो कुणीही असो; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या (Rajyasabha Election 2022) सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. दरम्यान राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

‘राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणी असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच उमेदवार उभे राहतील आणि निवडून जातील,’ असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केलीये. जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देतंय. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही.’ तसेच आम्ही संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) विरोधात नाही. त्यांना आमचा विरोध नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेने आता संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chhatrapati) यांना पक्षात आणण्याचा नाद सोडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या