Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांचा राज्यपालांना टोला; म्हणाले, “राजभवन राफेलच्या स्पीडने...”

संजय राऊतांचा राज्यपालांना टोला; म्हणाले, “राजभवन राफेलच्या स्पीडने…”

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे (Shivsena) ३९ आमदार तसेच महाविकास आघाडी सरकारला (MVA Govt) पाठिंबा देणारे अनेक अपक्ष आमदार यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

याच दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि बहुमताची चाचणी घ्यावी, असे राज्यपालांनी पत्राद्वारे सांगितले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या भूमिकेवरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.

गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यपालांनी विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीच्या फाईलसंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २४ तासांत महाविकास आघाडी सरकराला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. राजभवनात सध्या राफेल जेटचा वेगही कमी पडेल, इतक्या वेगाने काम होत आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या