Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Gaikwad : "राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईल"; शिंदेंच्या...

Sanjay Gaikwad : “राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईल”; शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे खासदार (Congress MP) आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ माजला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : गोळीबार प्रकरण चिघळले; संशयितांच्या दाव्यानंतर बडगुजरपुत्रास पोलिसांची नोटीस

आमदार गायकवाड म्हणाले की,”राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण (Reservation) संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस (Award) देईल,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा : Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

पुढे ते म्हणाले की,”महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशात आरक्षणाची आग लागली आहे. त्यातच मागासलेल्या जातींना इतर समाजांच्या बरोबरीने उभे करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले.असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आमच्या देशातले आरक्षण मला संपवायचे, असे वक्तव्य केले. काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांच्या पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखवली. संविधान (Constitution) धोक्यात आहे, संविधानात आपले आरक्षण संपवणार आहे, असा फेक नरेटिव्ह पसरवला आणि दलित समाजाची मते घेतली, आणि आज आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत”, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले.

हे देखील वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते ?

अमेरिकेमध्ये (America) एका मुलाखतीत बोलताना राहुल गांधी यांनी भारतातील (India) आरक्षणावरुन महत्वाचे विधान केले होते. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु. मात्र, सध्या देशामध्ये तशी स्थिती नाही. योग्य वेळ येईल तेव्हा याबाबत विचार केला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र, राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भाजप (BJP) तसेच समविचारी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात भाजपने आंदोलने (Agitation) देखील केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या