मुंबई | Mumbai
दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच शिवसेनेमध्ये (Shivsena) दसरा मेळाव्यावरुन जोरदार संघर्ष सुरू झाला होता. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे यंदाही दोन दसरा मेळाव्याच्या सभा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा कोण घेणार? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली होती.
अशातच शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर पुन्हा ठाकरेंचीच तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सभा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर पुन्हा ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे चित्र आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील ‘ते’ आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?