मुंबई । Mumbai
पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राऊत म्हणाले, गृहराज्यमंत्री दिव्य आहेत. आरोपीला पकडून सरकारने उपकार केले आहेत का?. राजकिय वरदहस्त असलेले अनेक गुन्हेगार आहेत. शांततेत अत्याचार असे गृहराज्यमंत्र्यांनी विधान केले, गृहराज्यमंत्री दिव्य आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत दिसले. राऊत म्हणाले की, लेखक, साहित्यिक, कवी या सर्व पदव्या त्यांना हव्या आहेत त्या एकनाथ शिंदे हे विकत घेऊ शकतात. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळू शकतो.
हे एकनाथ शिंदे कंपनी जे बोलत आहेत, त्यांचा मराठी साहित्य, इतिहास यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. प्रचंड पैसा आहे, अशाप्रकारचा पैसा आैरंगजेबाकडे पण होता. अमित शहा हे एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा देऊ शकतात. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सूरतवर हल्ला करावा लागला. कारण सूरजमध्ये गुजरातमध्ये इतका पैसा होता की, ते मोगलांना पैसा देत होते, या देशाच्या विरोधामध्ये. म्हणून छत्रपतींना सूरज लूटावी लागली आणि त्याच सूरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक जाऊन थांबली होती. फार मोठे साहित्य त्यावेळी त्यांच्याकडे होते. पुण्याच्या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, कोणतीही पार्टी आपल्या कार्यकर्त्याला म्हणत नाही की, जाऊन अत्याचार कर. ती एक विकृती असते. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीचा फोटो आमदारासोबत व्हायरल होत असल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. याबद्दलच बोलताना राऊत दिसले.
योगेश कदम यांनी काय म्हटलं होतं?
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं होतं की, “स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही”, असं योगेश कदम यांनी म्हटलं होतं.