Saturday, April 26, 2025
HomeनाशिकNashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली...

Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस

नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यात मविआमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी आपली प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत दुसरी फेरी चालू केली आहे. मात्र, अशातच आता लोकसभा निवडणुकी दरम्यान ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

नाशिक ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ताशी (Salim Kutta) संबंध असल्याच्या आरोपावरून तडीपारीची नोटीस आली आहे. परिमंडल दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी ही तडीपारीची नोटीस काढली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात अग्रभागी असणाऱ्या नेत्यालाच तडीपारीची नोटीस (Deportation Notice) आल्याने राजकीय सुडातून ही कारवाई केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान, काल महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणात बडगुजर यांच्याशी संबधित असलेल्या सलीम कुत्ता प्रकरणाचा उल्लेख केला होता. तसेच पालकमंत्री भुसे यांनी देखील आपल्या भाषणात बडगुजर यांचे नाव न घेता सलीम कुत्ता प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंचे लक्ष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस पाठविल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...