नाशिक | Nashik
आज देशासह राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा (Loksabha Election) निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. यात राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठे यश मिळताना दिसत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) आठ पैकी सहा जागांवर मविआचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, धुळ्यात अटीतटीची लढत झाली आहे.
हे देखील वाचा : Dhule Loksabha 2024 : मविआच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव ‘इतक्या’ हजार मतांनी आघाडीवर
धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात यंदा कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात लढत झाली. यात डॉ. बच्छाव यांनी ३ हजार ८३३ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे दोन वेळा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे डॉ.सुभाष भामरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच दोन्ही उमेदवार थोड्या फार मतांनी एकमेकांविरुद्ध आघाडी घेतांना दिसत होते.
त्यानंतर अकराव्या फेरीत डॉ. बच्छाव यांनी जोरदार मुसंडी मारत तब्बल १२ हजार मतांची आघाडी घेत भाजपचे डॉ. भामरे यांची दहाव्या फेरीची आघाडी तोडून टाकली होती. यानंतरच्या फेऱ्यांमध्ये शेवटपर्यंत दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत होताना दिसली. त्यामध्ये अखेर डॉ. बच्छाव यांनी तीन हजारांच्या फरकाने विजयश्री खेचून आणला.