Friday, May 17, 2024
Homeधुळेधक्कादायक ; मुलाच्या हत्येची आईनेच दिली सुपारी

धक्कादायक ; मुलाच्या हत्येची आईनेच दिली सुपारी

धुळे – प्रतिनिधी dhule

मेहेरगाव (ता.धुळे) येथील तरुणाच्या खूनाचा (murder) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवान तपास करीत धक्कादायक उलगडा केला आहे. सतत आई-वडील आणि पत्नीशी भांडण आणि दारूसाठी पैसे मागत असल्यामुळे कंटाळलेल्या आईनेच मदयपी मुलाची 25 हजारात सुपारी दिली. तर तिघांनी अमोल भामरे यांचा गळा आवळून खून केला.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) मयताची आई व एकाला अटक केली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे (Superintendent of Police Sanjay Barkunde) यांनी एलसीबीच्या वेगवान तपासाचे पत्रकार परिषदेत कौतुक केले.

मेहेरगाव येथील अमोल विश्‍वास भामरे (वय ३८) या तरुणाचा मृतदेह काल दि.१ रोजी नवलाणे गावच्या शिवारातील इंग्लीश मेडियच्या स्कूलच्या आवारात आढळून आला होता.त्याच्या मानेवर दोरीने गळफास दिल्याचे वळ होते. त्यामुळे अमोलचा खून झाल्याची फिर्याद त्याचे वडील विश्‍वास दामू भामरे यांनी सोनगीर पोलिसात दिली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखेकडून सुरु होता. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी वेगवान तपास सुरू केला.

अमोलच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढली. अवघ्या काही तासात पुंडलिक गिरधर भामरे रा.मेहेरगाव याला ताब्यात घेतले. त्यानेच त्याच्या दोन साथीदारांसह अमोलचा खून केल्याचा संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली, त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमोल भामरे याला पार्टी करण्याच्या बहाण्याने फोन करुन मेहेरगाव येथील बसस्थानकाजवळ बोलवले. त्यानंतर पुंडलीकचे दोन साथीदार आणि अमोल असे चौघे नवलाने गावच्या शिवारातील इंग्लिश मेडियम स्कुलच्या आवारात पार्टी करता गेले. तेथे दोरीने गळा आवळून अमोलचा खून केल्याची कबुली पुंडलीक भामरे याने दिली आहे.

धक्कादायक माहिती आली समोर

तसेच त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. अमोल भामरे हा काही एक काम धंदा करीत नव्हता. आई-वडील आणि पत्नीशी सतत भांडण करत होता. तसेच दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करायचा या सततच्या त्रासाला कंटाळून आई लता विश्‍वास भामरे हिने मुलगा अमोलला मारण्याची सुपारी पुंडलिक भामरे याला दिली.

अमोलच्या खुनाच्या बदल्यात लताबाईने पुंडलिक भामरेला २५ हजार रुपये देण्याचे कबुलही केले. त्यामुळे पुंडलिक भामरेने त्याच्या दोन साथीदारांसह अमोलचा गळा आवरुन खून केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लताबाई भामरे हिला ताब्यात घेतले. तिने देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघां आरोपींना पुढील कारवाईसाठी सोनगीर पोलिसांमध्ये हजर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून गुन्ह्यातील दोघं फरार आरोपींचा शोध सुरु आहे

ही कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील त्यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या