Sunday, May 18, 2025
Homeधुळेपाण्यासाठी महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

पाण्यासाठी महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

दहा-दहा दिवसानंतरही नळांना पाणी येत (Water is not coming to the taps) नसल्याने संतप्त झालेल्या क्षीरे कॉलनीतील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी (Women and senior citizens) आज पाण्याच्या टाकीवर (water tank) चढून शोले स्टाईल आंदोलन (Sholay Style Movement) केले. प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. प्रश्न न सुटल्यास महापालिकेला टाळे ठोकण्यात येईल व नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

क्षीरे कॉलनीत दहा – दहा दिवस पाणी येत नाही. संपूर्ण शहरातही अशीच बिकट अवस्था झाली आहे. क्षीरे कॉलनी परिसरात 10-11 दिवसांपासून पाणी आलेले नाही. नागरिकांना पाण्याचे जार विकत आणावे लागत आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही पाण्यासाठी घराबाहेर पडून भटकंती करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या उदासिन अधिकार्‍यांमुळे व लोकप्रतिनिधींमुळे ही वेळ आली आहे. मनपाच्या अधिकार्‍यांनी पाईपलाईन फुटल्याचे कारण सांगितले. धुळेकर नागरिक मनपाकडे पाणीपट्टी, घरपट्टी, रस्त्याचा कर, वृक्षाचा कर भरला जातो. तरी देखील सुविधा मिळत नाहीत. यासाठी महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. या आंदोलानाची दखल न घेतल्यास महापालिकेला टाळा ठोकू असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात प्रभाग क्र.4 व 5 मधील क्षीरे कॉलनी, परिमल कॉलनी, गिता कॉलनीसह परिसरातील महिला व पूजा चौधरी, कल्पना पाटील, सीमा फटकाळ, सुरेखा पाटील, सुरेखा सूर्यवंशी, सुनिता श्रॉप, मनोहर पंडीत, प्रमोद शिनकर, दिलीप जाधव, गजानन भदाणे, अशोक भामरे, दीपक भामरे, दगा चौधरी, टी.एस.चंद्रात्रे, हेमंत भदाणे, महेश भंडारी, अमोल पवार, आर.के. बाविस्कर, कुणाल सूर्यवंशी, महेंद्र कुलकर्णी, देवेंद्र भामरे, योगेश पाटील आदी सहभागी झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘रिलगिरी’ करणाऱ्या अंमलदारावर बलात्काराचा गुन्हा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik प्रेमसंबंध ठेवताना तरुणीस विवाहाचे आमिष दर्शवून वारंवार लैंगिक अत्याचार (Rape Case) केल्यानंतर पीडितेसह तिच्या पतीला मारण्याची धमकी देणाऱ्या शहर पोलीस...