Thursday, May 2, 2024
Homeनाशिकलाईट, कॅमेरा, ऍक्शन! मालिकांचे शूटिंग सुरु

लाईट, कॅमेरा, ऍक्शन! मालिकांचे शूटिंग सुरु

नाशिक | Nashik

करोनाच्या सावटात अखेर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मालिकांच्या शूटिंगला सुरवात झाली आहे. झी मराठी वाहिनी वरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकाचे चित्रिकरण नाशिकच्या वाडीवरे ह्या भागातील एका रिसॉर्ट मध्ये सुरू झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कलाकार तंतोतंत पालन करत या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

- Advertisement -

दरम्यान लॉक डाऊन सुरु झाल्यापासून मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. त्यामुळे जवळपास दोन महिने रिपीट टेलिकास्ट दाखवण्यात येत होता. तसेच मालिका निर्माते, कलाकार यांना मोठा फटका बसला होता. परंतु आता शासनाने या मालिकांना काही नियमावलीच्या आधारे शूटिंगला परवानगी दिल्याने निर्माते, कलाकार यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रेक्षकांनाही नवे भाग पाहता येणार आहे.

या मालिकांच्या शूटिंगसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक आदी ग्रामीण भाग निश्चित केला असून या निसर्गरम्य परिसरात शूटिंग सुरू केले आहे त्यासाठी कलाकारांनी नाशिकच्या ग्रामीण भागाला पसंती दिल्याने नाशिकचे नाव आता आणखी गाजणार आहे. नव्याने टीव्हीवरील मालिकांचे शुटींग सुरू झाल्याने आता नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनेक ठिकाणी कलाकारांनी शूटिंगच्या कामांना प्रारंभ केला आहे. करोनामुळे संचारबंदी असल्याने सर्वच क्षेत्रात याचा आर्थिक फटका बसला. यात ह्यात बॉलिवूड क्षेत्राचाही समावेश आहे. मात्र मुंबई पुणे वगळता इतर ठिकाणी संचारबंदी शिथिल केल्याने कलाकारांनी आता नाशिकच्या निसर्गरम्य भागाची निवड केली आहे.

इगतपुरी, घोटी, त्रंबकेश्वर आधीच निसर्गरम्य असून पावसाळ्यात तर हा आदिवासी भाग अजूनच सौंदर्य सृष्टीने नटलेला दिसतो. नाशिक, मुंबई आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी चांगली असल्याने कलाकारांनी आता नाशिकमध्ये मालिकांचे चित्रिकरण सुरू केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या